आजचे पंचांग 14-01-2022
![](https://app.drjyotijoshi.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-13-at-8.46.42-PM-1024x1024.jpeg)
![](https://app.drjyotijoshi.com/wp-content/uploads/2022/01/WhatsApp-Image-2022-01-13-at-8.46.43-PM-1024x1024.jpeg)
राशीभविष्य
शुक्रवार, १४ जानेवारी २०२२
{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
मेष
आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत अगदी आनंदात, उत्साहात व्यतीत कराल. त्यांना त्यांच्या मनाजोगता वेळ द्याल. आज काही सुग्रास भोजनाचा बेत संभवतो.
वृषभ
आजचा आपला दिवस आनंद, उत्साह, स्फूर्ती यांनी युक्त असेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा आज पूर्ण होतील. आज स्वतःसाठी वेळ काढाल. आजच्या सुंदर दिवसाचा योग्य उपयोग करा.
मिथुन
आजचा आपला दिवस काहीसा तणावग्रस्त, चिंताग्रस्त जाऊ शकतो. अविचाराने कोणतीही कृती करू नका. काही अनावश्यक काळजी, चिंता सतावतील. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा लागेल.
कर्क
आजच्या दिवशी अनेक दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा, अपेक्षांची पूर्ती होईल. प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी संभवतात. त्यांच्या सहवासाने आनंदून जाल.
सिंह
आज आपण आपल्या कामाप्रती अधिक जागरूक राहाल. काही महत्वाची कामे मार्गी लावाल. आपल्या कामातून आज कर्तव्यपुर्तीचा आनंद घ्याल.
कन्या
आज इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर भाग्याची प्राप्ती होईल. काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभेल. काही प्रवास संभवतात.
तुळ
आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काहीशी मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र निराश न होता आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करा.
वृश्चिक
आज वैवाहिक जोडीदारासमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल.जोडीदाराचे उत्तम प्रेम व सहकार्य मिळेल. आपणही जोडीदाराच्या भावभावना समजून घ्याल. जोडीदारासमवेत आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल.
धनु
आज काहीसा मानसिक, शारीरिक थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणावरही अति विश्वास ठेवू नये.
मकर
आजचा आपला दिवस उत्साहवर्धक असेल. आपल्या आवडीनिवडी, कला, छंद यांची जोपासना कराल. आज स्वत:साठी वेळ काढाल. आज आपल्या मुलांनाही उत्तम वेळ द्याल.
कुंभ
आज घरातच रममाण व्हाल. उत्तम गृहसौख्याची अनुभूती आज मिळेल. घरातील ज्येष्ठांची सेवा कराल. काही पाहुण्यांचे आगमन संभवते. सर्वांसोबत आजचा दिवस उत्साहात साजरा कराल.
मीन
आज अनेक अडचणी, अडथळ्यांचा सामना करून अपेक्षित ध्येयाची प्राप्ती कराल. काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात भाग्याचीही साथ लाभेल. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी.