Skip to content

डाँ. ज्योती जोशी

आमच्याबद्दल

ज्योतिषशास्त्राचा २२ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या एस्ट्रोगुरु डॉ ज्योति जोशी

ज्योतिषशास्त्र ही आपल्या संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आपल्या ऋषीमुनींनी कठोर परिश्रमातून केलेल्या संशोधनाचे ते फळ आहे. त्याची महती इतकी प्रचंड आहे की, आज हजारो वर्षांनंतरही ते जसेच्या तसे लागू होत आहे. ज्योतिषशास्त्राची निर्मिती मनुष्याच्या कल्याणासाठी करण्यात आलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन सुखद, सुखकर होऊ शकते. अशा या ज्योतिषशास्त्राची श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉ.सौ. ज्योती जोशी गत 22 वर्षांपासून सेवा करीत आहेत.  आजचा आधुनिक काळ हा विज्ञानाचा काळ आहे. विज्ञान हे सिद्धांतांवर आधारलेले आहे. म्हणजे विज्ञानाकडे एखादी गोष्ट कशी घडली किंवा कशी घडू शकली असेल हे स्पष्ट करणारे सिद्धांत आहेत. त्यामुळे कुणाचाही त्यावर सहज विश्वास बसतो. विज्ञानाच्या आधाराने एखादी गोष्ट सांगितली तर तिला शक्यतोवर कुणीही नाकारात नाही. ही गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत पाहिजे तितक्या प्रमाणात लागू होतांना दिसत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योति जोशी यांनी श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राची सुरुवात केली. विज्ञान म्हणजे शास्त्र आणि ज्योतिष सुद्धा शास्त्रच आहे. विज्ञानाप्रमाणेच ज्योतिषशास्त्र सुद्धा सिद्धांतावरच आधारलेले आहे. फक्त ते सिद्धांत शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगता आले पाहिजेत. तेव्हाच लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील. तेव्हाच ते त्यांच्या मनाला पटू शकेल. आजची तरुण पिढी तर कुणी सांगतंय म्हणून सरळ सरळ कोणत्याही गोष्टीवर विशास ठेवत नाही. कारण त्यांची स्वत:ची एक वैचारीक शक्ती आहे. त्या शक्तीच्या कसोट्यांवर ते प्रत्येक गोष्ट पारखुन घेत असतात. आजच्या तरुण पिढीला आपल्या संस्कृतीविषयी प्रेम किंवा आस्था नाही, ही बाब असत्य आहे. त्यांनाही संस्कृतीचा अभिमान आहे, प्रेम आहे. मात्र त्यांच्या विचारांना पटणाऱ्याच गोष्टी ते करीत असतात. त्यांना जर ज्योतिषशास्त्र शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावले गेले तर त्यांचाही विश्वास बसेल. समाजमनाची ही मानसिकता डॉ.सौ. ज्योती ज्योशी यांनी हेरली होती. समाजाच्या मानसिकतेचा त्यांनी आधी परिपूर्ण अभ्यास केला होता. म्हणून त्यांनी आपल्या संस्थेचे नावच श्री ज्योतिष संशोधन केंद्र असे ठेवले आहे. म्हणजेच या संस्थेमध्ये फक्त फलकथनच केले जात नाही तर ज्योतिषशास्त्रावर संशोधन सुद्धा केले जाते. डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जातकांच्या पारिवारीक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक समस्या सोडविल्या आहेत. ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य वर्तविणारे शास्त्र अजिबात नाही. ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर नक्कीच करु शकतो. संकट काळात त्याला सावध करुन संकटांची दाहकता कमी करुन शकतो. तसेच प्रगतीचा काळ असेल तर मिळणाऱ्या संधीचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सजग करु शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे आणि तेवढा त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास देखील आहे.

                                                                                              ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योति जोशी या जळगाव येथे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासवर्ग घेतात. आतापर्यंत अनेकांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन त्यांनी दांडगा जनसंपर्क कमविलेला आहे. यामाध्यमातून त्या ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे काम करीत असतात. जे जातक समक्ष येऊ शकत नाहीत त्यांना त्या फोनवरुनही मार्गदर्शन करीत असतात. एवढेच नव्हे तर तर परदेशातील जातकांनाही त्या फोन आणि ई-मेलवरुन मार्गदर्शन करीत असतात. जातकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्रामार्फत वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबविले जात असतात. त्यामध्ये कन्येच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी कन्येची मोफत पत्रिका बनवून देण्याचा उपक्रमाचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते. संपूर्ण महाराष्ट्र भरात त्यांनी कन्येच्या जन्मपत्रिका बनवून वितरीत केल्या आहेत. असे उपक्रम राबवित असतांना काही तरी मोठे करावे, जेणे करुन ज्योतिषशास्त्राला घरात घरात आपण पोहचवू शकु हा विचार डॉ.सौ. ज्योती जोशी यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांच्या या विचारातून एका अभिनव उपक्रमाचा जन्म झाला तो म्हणजे ऑनलाईन मोफत ज्योतिषशास्त्र सर्टिफिकेट कोर्स होय. आज सर्वांकडे स्मार्ट फोन आले आहेत. त्यामध्ये इंटरनेटसुद्धा आले आहे. सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या उपक्रमाची कल्पक संकल्पना त्यांना सूचनली होती. या उपक्रमाने ज्योतिषशास्त्राच्या पारंपारिक अभ्यासवर्गाच्या परिसिमा तोडत नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. व्हॉटसअॅप, फेसबूक पेज आणि युट्युब चॅनल याद्वारे या उपक्रमाला मूर्तरुप देण्यात आले आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आहे.  डॉ.सौ. ज्योती जोशी या आपल्या कार्यक्षेत्रासह सामाजिक कार्यातही सदैव सहभागी होत असतात. जळगाव शहरातील लायन्स क्लब आणि इनरव्हिल क्लबच्या त्या सचिव आणि सदस्य राहिलेल्या आहेत. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.  ज्योतिषशास्त्राची सेवा, प्रचार – प्रसार करण्यासाठी डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करुन विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. याशिवाय अखिल भारतीय ज्योतिषांच्या अनेक अधिवेशनांमध्ये सुद्धा त्यांनी व्याख्याने दिली आहे.  याशिवाय अल्पावधीत लोकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या “ज्योतिषशास्त्र – अ,ब,क,ड’ भाग 1,भाग 2 आणि भाग 3 या तीन पुस्तकांचे लेखन सुद्धा त्यांनी केलेले आहे. व्हॉटसअॅप ग्रुप आणि आपल्या फेसबूक पेजवरही त्या ज्योतिषशास्त्रावरील विविध विषयांवर नियमित लेखन करीत असतात. त्यांनी आपले युट्युब चॅनल सुद्धा सुरु केलेले असून त्याद्वारे त्या नियमित मार्गदर्शन करीत असतात.

                                                                                                ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योति जोशी व श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या या संपूर्ण सेवाकार्याची दखल वेळोवेळी घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे 24 व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात ज्योतिषशास्त्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पीएचडी प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच नागपूर, कोल्हापुर, पुणे अशा विविध ठिकाणी संपन्न झालेल्या ज्योतिष अधिवेशन व संमेलनात त्यांचा सन्मान व व्याख्यान झालेले आहे.

 

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)