Skip to content

डाँ. ज्योती जोशी

परदेश गमनासाठी ज्योतिषशास्त्र

परदेश गमनासाठी ज्योतिषशास्त्र

पूर्वी साधं आपलं गाव सोडावं लागलं तरी खूप मोठं संकट आपल्यावर कोसळलंय ही भावना जनसामान्यांमध्ये होती. मात्र आज देशाच्या बाहेर जाणं ही खूप मोठी बाब झाली आहे. परदेश गमन करणे हे आज प्रतिष्ठेचे मानले जाते. नवीन तंत्रज्ञानामुळे आणि उपलब्ध झालेल्या साधनांमुळे जग खूप जवळ येत चालले आहे. साधने तर इतके झाले आहेत की, परदेशात जाणे काही मोठी बाब आज राहिलेली नाही. तरीही परदेशात जाण्यासाठी पत्रिकेत विशिष्ट अशी ग्रह स्थिती जुळून यावी लागते. फक्त भरपूर पैसा जवळ असला म्हणजे परदेशात जाता येते नाही. काही लोकांना तर कुठल्या ना कुठल्या कारणाने विमानतळावरुन परत यावे लागते. तर काही लोकांना ध्यानी मनी नसतांनाही, जवळ पुरेसा पैसा नसतांनाही परदेश गमन घडू शकते. कारण त्यांच्या पत्रिकेत परदेश गमन योग जुळून आलेला असतो. आज विशेषतः मुला – मुलींच्या पालकांना आपली मुलं परदेशातील जातील का? हा प्रश्न पडलेला असतो. कारण आपल्या मुलांनी परदेशात जावं अशी त्यांची इच्छा असते. काही मुलींच्या पालकांची तर आपल्याला परदेशात राहणारा जावाई मिळावी, अशी अपेक्षा असते.

या सर्व गोष्टी जातकाच्या पत्रिकेवरुन कळू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार परदेश गमनासाठी पत्रिकेत तृतीय, नवम आणि द्वादश ही स्थाने प्रामुख्याने बघितली जातात. पत्रिकेतील तृतीय स्थान हे लहान – मोठ्या प्रवासाचे स्थान आहे. नवम स्थान म्हणजे आपले भाग्य स्थान असून यावर दुरचा प्रवास बघितला जातो. भाग्य स्थान आणि द्वादश स्थान हे मुख्यतः खर्च दाखवणारे, जन्मस्थळ या पासून लांब जाण्याचे दाखविणारे स्थान आहे. परदेश गमन फायदेशीर ठरेल का? काही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागेल का? या बाबी या स्थानावरुन कळतात. म्हणून आपल्या किंवा आपल्या प्रियजनांच्या पत्रिकेतील परदेश गमन योग जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

[wpforms id="149"]