आजचे पंचांग
*राशीभविष्य*
*रविवार, १६ ते २२ जानेवारी २०२२*
{आज ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
*मेष*
या सप्ताहाची सुरुवातच धडाकेबाज राहील. काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. मात्र आपल्या आत्मविश्वासाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणेही आवश्यक राहील. त्यासाठी काही ज्येष्ठ, तज्ञ व्यक्तींबरोबर चर्चेतून नव्या योजना व कल्पना सुचतील. गृहपयोगी काही वस्तूंची खरेदी कराल. संततीकडे, घराकडे विशेष लक्ष द्याल. छोट्या छोट्या कारणांनी जोडीदार नाराज होणार नाही ना याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
*वृषभ*
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. कुटुंबीयांसमवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. परंतु आपल्या कार्यक्षेत्रात ऊर्जा जाणवेल. घरातील काही महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्याल. काही सामाजिक कार्यातही सहभागी व्हाल. आपल्या कला, छंद, आवडीनिवडी यांच्यासाठी वेळ काढाल. स्वतःवर जास्त खर्च होतील. चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
*मिथुन*
हा सप्ताह आपणासाठी अतिशय उत्तम असेल. एक नवीन ऊर्जा, उत्साह, उमेद यांचा अनुभव घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य लाभेल. कुटुंबीयांची उत्तम साथ, सहकार्य मिळेल. गृहसजावटीच्या काही वस्तूंची खरेदी या सप्ताहात संभवते. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्याल व त्यांचे आशीर्वाद देखील प्राप्त कराल. संतती मनाप्रमाणे वागेल. तसेच आपल्या आज्ञेत राहील. खूप दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता या सप्ताहात संभवते.
*कर्क*
सप्ताहाची सुरुवात काहीशी चिंतायुक्त, कष्टप्रद असेल. काही शारीरिक, मानसिक त्रास संभवतात. मात्र या सर्वांवर मात करून आपण पुन्हा नवीन उत्साहाने, जोमाने संपूर्ण सप्ताह आनंदात व्यतीत कराल. आपल्या कामाप्रती, कर्तव्याप्रती दक्ष राहून चोखपणे आपले काम पार पाडाल. घरासाठी काही खर्च संभवतात. जोडीदाराशी सामंजस्याने, प्रेमाने वागाल.
*सिंह*
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छांची पूर्तता होईल. सप्ताहाच्या मध्यात मात्र काहीशी मानसिक अस्थिरता जाणवेल. मनस्तापासारखे काही प्रसंग उद्भवू शकतात. अचानक काही खर्चही वाढतील. मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने यावर मात करून सप्ताहाचा उत्तरार्ध नवीन उत्साहाने घालवाल.
*कन्या*
हा सप्ताह कर्माला प्राधान्य देणारा असेल. आपल्या कार्यक्षेत्रात अधिक मेहनत, परिश्रम,कष्ट घ्यावे लागतील. वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अचानक काही लाभ होऊ शकतात. मित्र-मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. सप्ताहाच्या मध्यात मात्र काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीशी चिडचिड, घुसमट संभवते. मात्र नशिबाची, भाग्याची साथ लाभेल. पुन्हा नवीन उर्जेने कामास सुरुवात कराल.
*तुळ*
सप्ताहाच्या सुरुवातीला नशिबाची, भाग्याची उत्तम साथ लाभेल. काही दूरचे प्रवास संभवतात. धार्मिक स्थळांना भेट द्याल वा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी अधिक मेहनत घ्याल. आपल्यातील धाडस व बुद्धिमत्ता यांचा योग्य मेळ घालून दिलेले काम पूर्ण कराल. त्यातूनच या सप्ताहात लाभप्राप्तीही संभवते. सप्ताहाच्या उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच खर्चाचे योग्य नियोजनही करावे लागेल.
*वृश्चिक*
सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काहीशी विमनस्क स्थिती असेल. प्रवास सांभाळून करावेत.मात्र आपल्या लढवय्या स्वभावाने आपण या सर्वांवर यशस्वी मात कराल. नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. आपणही आपले काम संपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पूर्ण कराल. काम करताना काहीशी दगदग, धावपळ होईल. मात्र केलेल्या कष्टांची शुभ फळेदेखील नक्कीच प्राप्त होतील.
*धनु*
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, संततीसौख्य सामान्य असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराचे प्रेम व सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या मध्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणावरही अति विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रलोभनांना, आमिषांना बळी पडू नये. सप्ताहाच्या उत्तरार्धात कामाचा अतिरिक्त तणाव असेल. अति कामाचा परिणाम आरोग्यावर होणार नाही याची काळजी घ्या.
*मकर*
सप्ताहाच्या सुरुवातीला काहीसे अनारोग्य जाणवेल. आरोग्याच्या काही कुरबुरी सतावतील. प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी. जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यात पुन्हा काही अडचणी, त्रास जाणवतील. काही संकटांना तोंड द्यावे लागू शकते. घरातील सदस्यांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. वायफळ गोष्टींवर वेळ वाया न घालवता केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करावे. त्यातूनच सप्ताहाच्या अखेरीस भाग्याचे प्राप्ती होईल.
*कुंभ*
सप्ताहाची सुरुवात अतिशय सुंदर असेल. नवीन उत्साह, उर्जा जाणवेल. आपल्या कार्यक्षेत्रात काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असेल. त्यानुसार योग्य ती पावले देखील उचलाल. मात्र काही स्पर्धक हितशत्रू त्रास देऊ शकतात. त्यांवर बारकाईने लक्ष द्यावे लागू शकते. सप्ताहाच्या अखेरीस काहीसा तणाव जाणवेल. अचानक घरातील काही जबाबदार्या वाढतील. मात्र घरातील सदस्यांची योग्य साथ मिळेल.
*मीन*
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. घरातील काही महत्त्वाची व बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित राहिलेली कामे या सप्ताहात पूर्ण कराल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना कुटुंबियांचे मत देखील विचारात घ्याल. आपल्या उत्साही व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने व नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाने इतरांची मने जिंकून घ्याल. कुटुंबीयांच्या आरोग्याचे काहीशी काळजी घ्यावी लागेल. कार्यक्षेत्रातील स्पर्धेमुळे दगदग, धावपळ वाढेल. कामाचे योग्य वेळापत्रक व नियोजन करणे आवश्यक राहील.
SUN
Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
1
2
3
4
5
6
7
8
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31