आजचे पंचांग 27-01-2022
*राशीभविष्य*
गुरूवार, २७ जानेवारी २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}
मेष
आजचा आपला दिवस चिंतायुक्त जाऊ शकतो. कोणत्याही विषयावर व्यक्त होताना आपल्या बोलण्याने कोणी दुखावणार नाही याचा आधी विचार करा.
वृषभ
आज जोडीदाराबद्दल कोणतेही गैरसमज निर्माण करून न घेता सामंजस्याची भूमिका ठेवा. व्यापार व्यवसायाच्या दृष्टीने काही मह्त्वपूर्ण निर्णय घेताना काहीशी संभ्रमावस्था जाणवेल.
मिथुन
आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे राहील. योग्य वेळी योग्य उपचार करून घेणे आवश्यक राहिलं.
कर्क
आज आपल्या काही आवडी निवडी, कलागुण, छंद यांच्यासाठी वेळ काढाल. मुलासमवेत एखादा नवीन छंद जोपासण्यासाठी प्रयत्नशील राहाल.
सिंह
आपल्या खंबीर स्वभावानुसार आज काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरातील सदस्यांचे पाठबळ व सहकार्य मिळेल.काहीसा नव उत्साह जाणवेल.
कन्या
आज व्यापार – व्यवसायसंबंधी काही महत्वपूर्ण निर्णय घेतांना सजगता बाळगावी. घरात चैतन्याचे वातावरण राहिलं.
तुळ
आज आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अतिआवश्यक राहील. आपल्या बोलण्याने कोणी दुखावू शकते, त्यामुळे सतर्कता बाळगावी.
वृश्चिक
आज केवळ आपल्या नित्य कर्मावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे राहील. विनाकारण मनस्ताप होईल असे प्रसंग टाळावेत.
धनु
आज काही धार्मिक कार्यात मग्न राहाल. आज मन शांत ठेवणे आवश्यक राहिलं. आपले काम भले व आपण भले अशी भूमिका ठेवणे योग्य राहिलं.
मकर
आज कोणत्याही परिस्थितीत प्रलोभने, आमिष यांच्यापासून दूर राहावे. खोटी स्तुती वा तारीफ यांनी भारावून जाऊ नये. तारतम्य बाळगावे.
कुंभ
आज आपल्या कामातून आनंदाची प्राप्ती कराल. आपल्या मेहनत व परिश्रमाचे चीज आज प्राप्त कराल. मात्र काहीशी दगदग संभवते.
मीन
आज काही उपासना, पुजा-अर्चना करण्यात वेळ घालवाल. काही आवश्यक कामेही मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहाल.