Skip to content

डाँ. ज्योती जोशी

अ भा ज्योतिष अधिवेशन

अँस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव आयोजित
प्राचार्य रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमी सातारा
आणि अभिजीत प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई प्रायोजित
* ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन( वर्ष दुसरे )*

दि. ०८ व ०९ जून २०२२
पुणे

ज्योतिष अधिवेशनासाठी..

आम्हाला मदतीचे हात हवे आहेत.. .

शास्त्राच्या प्रचार-प्रसार, प्रसिद्धीसाठी…
अधिवेशन ज्योतिष विश्वातील सर्वांसाठी…

नमस्कार!

अधिवेशन म्हणजे समविचारी लोकांनी एका व्यासपिठावर एकत्र यावं. विचारांचं आदान-प्रदान करावं. अधिवेशन म्हणजे एक असं संमेलन किंवा सोहळा ज्यात जेष्ठांसह, तज्ज्ञांसह, नवोदितांसह सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावं. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं आणि इतर सर्वांनी ते ग्रहण करावं. ज्योतिषशास्त्र हे आपल्या भारतीय संस्कृतीतील अनमोल असं शास्त्र आहे. शास्त्राच्या प्रचार-प्रसारासाठी, शास्त्राच्या सर्व अभ्यासकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी अधिवेशन हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आतापर्यंत आपल्या देशात अशी अनेक अधिवेशनं झाली आहे, होत आहे आणि यापुढेही होत राहतील. कारण ज्योतिषशास्त्र हे अभिजात असं शास्त्र आहे . जे हजारों वर्षांपासून स्वत:चे अस्तित्व व महत्त्व टिकवून आहे. त्यामुळे त्याचा प्रचार-प्रसार सदैवच सुरु राहिल.

गेली दोन वर्ष आपण या आनंदाला कुठेतरी पारखे झाले होतो. आता पुन्हा एकदा ही सुसंधी आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे दि. ०८ व ०९ जून २०२२ या कालावधी पुणे येथे ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या या दोन दिवसांमध्ये ज्योतिष विश्वातील जेष्ठ व तज्ज्ञांसह, ज्योतिष अभ्यासक व ज्योतिषप्रेमी देखील उपस्थित असतील. ज्यामुळे विचारांचं आदान-प्रदान होणं, अभ्यासाची उचित दिशा सापडणं, आपल्या क्षेत्रात नवीन ओळखी होणं, परिचय होणं या सर्व दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आपण जेव्हा एखाद्या विषयाचा अभ्यास करतो तेव्हा त्या विषयाशी संबंधित अधिवेशनात आपण उपस्थित राहणं अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. किंबहूना ते आपलं कर्तव्य व जबाबदारी ठरते. त्यामुळे देखील आपण या अधिवेशनात यायला हवं. किंबहूना आम्ही तर तुम्हाला या अधिवेशनात सक्रिय मदतीचे आवाहन करीत आहोत. कारण ज्या कार्यात सर्वांचा सहभाग असतो ते कार्य यशस्वीपणे पूर्ण होतं, याचा आम्हाला विश्वास आहे. शिवाय आपण अभ्यास करीत असलेल्या शास्त्राच्या अधिवेशनात सक्रिय सहभागी होण्याचा तुम्हाला अनुभव व आनंद प्राप्त होईल, तो वेगळाच! त्याची तुलना इतर कशा सोबतही होऊ शकत नाही. आतापर्यंत आपल्या संस्थेचे जेही उपक्रम झाले आहेत, त्या सर्वांमध्ये तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. हे अधिवेशन म्हणजे आपल्या संस्थेमार्फत होणारे सर्वात मोठे कार्य आहे. त्यामुळे या कार्यात आम्हाला मदतीच्या हातांची अधिक आवश्यकता आहे. त्यासाठी आपण अधिवेशनाची कार्यकारणी आधी निश्चित करणार आहोत व त्यानुसारच कामाची विभागणी केली जाईल.

अधिवेशन कार्यकारणी

  • कार्याध्यक्ष 2
  • उपाध्यक्ष 3कार्यवाह 1
  • सहकार्यवाह 1
  • खजिनदार 1
  • कार्यकारणी सदस्य – २०
  • प्रसिद्धी व्यवस्था 2
  • व्यासपीठ व्यवस्था 2
  • भोजन व निवास व्यवस्था 2
  • जिल्हा प्रतिनिधी – प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 प्रतिनिधी

अशा प्रकारे अधिवेशनाची कार्यकारणी राहणार असून त्यानुसार जबाबदारी देखील दिल्या जाणार आहेत. तसेच कार्यकारणी सदस्याला अधिवेशनातील सक्रिय सहभागाचे सर्टिफिकेट देखील दिले जाईल. त्यानुसार ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांनी जबाबदारी स्विकारण्यासाठी स्वत:हून पुढे यावे व अधिवेशन यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी सक्रिय मदत करावी.

धन्यवाद!
शुभम भवतु!
डॉ.सौ. ज्योती जोशी
श्री ज्योतिष संशोधन केंद्र, जळगाव

कार्यकारणीत सहभागी होण्यासाठी खालील ग्रुप जॉईन करावा

लिंक कॉपी करा आणि शोधा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा

https://chat.whatsapp.com/JdOyZc9YinEKV0X8kaPVI0

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)