Skip to content

डाँ. ज्योती जोशी

आजचे पंचांग 22-01-2022

*राशीभविष्य*   


शनिवार, दि. २२ जानेवारी २०२२

{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद}


मेष
आजच्या दिवशी आपल्या आवडीनिवडी, कलागुण व छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस राहील. संततीसमवेत आनंदात वेळ व्यतीत कराल.

वृषभ
आज उत्तम गृहसौख्याचा लाभ घ्याल. घरातील काही बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याकडे आज कल राहीलं.

मिथुन
आज कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी त्यावर एकदा सखोल विचार करणे आवश्यक राहीलं. वरिष्ठांचा सल्ला घेणे हितावह ठरेल.

कर्क
आजचा दिवस कुटुंबीयांसमवेत आनंदाने व्यतीत कराल. आज कुटुंबासमवेत सुग्रास भोजनाचा योग देखील संभवतो. आपल्या गोड बोलण्याने आज इतरांची मने जिंकून घ्याल.

सिंह
आज योग्य आचार व विचार यांची सांगड घालून आपला कार्यभाग साधाल. आज आपली कामे झपाट्याने उरकण्याकडे कल राहीलं.

कन्या
आजचा दिवस काहीसा तणावयुक्त, चिंतायुक्त जाऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहीलं. आपल्या बुद्धिमत्तेला, गुणांना आज हवा तितका वाव मिळणार नाही.

तुळ
आज सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होईल. बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभाची पूर्तता आज होईल. त्यामुळे सुखावून जाल.

वृश्चिक
आज कामाच्या संदर्भात काही तणाव,चिंता जाणवतील.वरिष्ठांशी काही मतभेद होणार नाहीत,याची काळजी घ्यावी. आपले रोजचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करावे.

धनु
आज काही भाग्यप्राप्ती, लाभप्राप्ती संभवते. वरिष्ठ मंडळींचे सहकार्य, मार्गदर्शन लाभेल. मन, विचार सकारात्मक ठेवणे आवश्यक.

मकर
आजचा दिवस काहीसा खडतर जाऊ शकतो. अचानक काही समस्या, प्रश्न निर्माण होतील. प्रकृतीचीही काळजी घ्यावी लागेल. केवळ आपण भले आणि आपले काम भले अशी भूमिका ठेवणे योग्य राहील.

कुंभ
आज सुखी दांपत्य जीवनाचा अनुभव घ्याल. स्वतःसाठी देखील वेळ काढाल. जोडीदारासमवेत काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

मीन
आज शारीरिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या काही समस्या, कुरबुरी जाणवतील. सकारात्मक मनन, चिंतन करणे आवश्यक राहीलं.

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)