Skip to content

डाँ. ज्योती जोशी

आजचे पंचांग 23-01-2022

*साप्ताहिक राशीभविष्य*   


दि.२३ ते २९ जानेवारी २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

मेष
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, वाहन, वास्तू सौख्य सामान्य असेल. जोडीदाराशी वाद-विवाद, कटकट होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गैरसमज टाळावेत. कामानिमित्त काही प्रवास घडू शकतात. काही नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. नोकरी व्यवसायातून लाभप्राप्ती होईल. मात्र त्यासाठी कष्टही घ्यावे लागतील. नोकरी-व्यवसायात काही अडचणींचा देखील सामना करावा लागू शकतो. वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. काही ठिकाणी नमतेपणाची भूमिका घेणे हितावह असेल.

मुख्यपृष्ठ

वृषभ
सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याच्या कुरबुरी सतावतील. प्रकृतीची योग्य काळजी घेणे श्रेयस्कर राहील. खाण्यापिण्याच्या सवयींवर ताबा ठेवणे आवश्यक असेल. पारिवारिक सुख सामान्य असेल. परिवार, कुटुंबीयांवर अचानकपणे काही अनपेक्षित खर्च करावे लागू शकतात. गृहसौख्य, वास्तू, वाहन सौख्य सर्वसामान्य असेल. आपल्या पराक्रमी, धाडसी स्वभावाच्या जोरावर अपेक्षित यश प्राप्त कराल. मात्र फक्त स्वप्नरंजन नव्हे तर प्रत्यक्ष कृती महत्त्वाची राहील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काहीसा तणाव जाणवेल. काही अप्रिय घटना घडू शकतात किंवा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगावी.

मिथुन
हा सप्ताह आपणासाठी सर्वसाधारण असेल. सप्ताहाची सुरुवात उत्तम, उत्साही व नाविन्यपूर्ण असेल. स्वतःसाठी वेळ काढून बऱ्याच नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घ्याल. सप्ताहाच्या मध्यात मात्र प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. हितशत्रू स्पर्धक त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे मनस्ताप वाढेल. जोडीदाराचे मात्र उत्तम सहकार्य व पाठबळ मिळेल. नोकरदार व व्यावसायिकांना काही नवीन संधी प्राप्त होतील. त्यांचा अवश्य लाभ करून घ्या. या सप्ताहात कर्तव्यपूर्तीतूनच भाग्याची व लाभाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे आपले कर्म करण्यावर भर द्या. प्रत्यक्ष कृतीवर विशेष लक्ष द्या.

कर्क
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. कुटुंबसौख्य, गृहसौख्य सर्वसाधारण लाभेल. संततीवर प्रेम करण्याबरोबरच संतती वर लक्ष देणे देखील आवश्यक असेल. जोडीदाराशी काही मतभेद संभवतात. उभयतांमधील गैरसमज टाळावेत. छोट्या छोट्या कारणांनी वाद, कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नोकरदार व्यावसायिकांसाठी उत्तम कालावधी. स्पर्धक, हितशत्रु यांच्या कारवाया हाणून पाडाल. सप्ताहाच्या अखेरीस आरोग्याचे काही प्रश्न डोके वर काढतील. त्यामुळे आधीच योग्य ती काळजी घ्या.

सिंह
या सप्ताहाची सुरुवात धडाकेबाज असणार आहे. अनेक अडचणी, अडथळ्यांवर मात करून या सप्ताहात आपण आपले कर्तुत्व सिद्ध कराल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य सर्वसाधारण असेल. जोडीदाराचे सौख्य मात्र लाभेल. संततीदेखील मनाप्रमाणे लागेल. संततीच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्या. नोकरदार मंडळींसाठी संघर्षमय सप्ताह असेल. मात्र प्रामाणिकपणे आपले काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या त्यांची शुभ फलिते नजीकच्या काळात अनुभवास येतील. सप्ताहाच्या अखेरीस आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल.

कन्या
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य सर्वसामान्य लाभेल. वाहन वास्तू सौख्य लाभेल. आपले कर्तृत्व, शौर्य, धाडस सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. संततीवर विनाकारण चिडचिड करू नका. त्यांच्याशी सामंजस्याने व्यवहार करणे हितकर राहील. भाग्याची बऱ्यापैकी साथ लाभेल. नोकरदार व्यावसायिकांसाठी सर्वसामान्य कालावधी राहील. मित्र परिवारावर काही खर्च संभवतात. आरोग्य सर्वसामान्य राहिल.

तुळ
हा सप्ताह आपणासाठी उत्तम जाईल. उत्तम पारिवारिक, कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंबासमवेत आनंदात काळ घालवाल. आपल्या कष्टाने, परिश्रमाने, मेहनतीने भाग्यप्राप्तीचा आनंद घ्याल. उत्तम गृहसौख्य, वास्तू, वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व उत्तम सहकार्य मिळेल. उत्तम दाम्पत्य जीवनाचा अनुभव घ्याल. संततीसुद्धा मनाप्रमाणे वागेल. नोकरदार व व्यावसायिकांसाठी देखील नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक प्राप्ती चांगली असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील उत्तम कालावधी. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करावा. मित्र मंडळींवर काही खर्च संभवतात.

वृश्चिक
सप्ताहाची सुरुवात काहीशी तणावपूर्ण, चिंतायुक्त असेल. कौटुंबिक सौख्य, गृहसौख्य, वास्तू, वाहनसौख्य उत्तम मिळेल. दांपत्य जीवन काहीसे असंतुष्ट राहील. जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरदार, व्यावसायिकांसाठी अधिक मेहनत व परिश्रमाचा कालावधी असेल. काही महत्त्वपूर्ण, धाडसी निर्णय घ्याल. आरोग्य सर्वसामान्य असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम कालावधी त्याचा सदुपयोग करून घ्यावा.

धनु
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल अचानक काही लाभ व इच्छांची पूर्तता होईल. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतील. सप्ताहाच्या मध्यात मात्र काहीसे नैराश्य व उदासीनता जाणवेल. अचानक काही खर्च उद्भवतील. मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने या सर्वांवर मात करून पुन्हा नव्याने सुरुवात कराल. काही धाडसी पराक्रमी निर्णय घ्याल व त्यावर योग्य अंमलबजावणी देखील कराल. कौटुंबिक व गृहसौख्य देखील उत्तम असेल. जोडीदाराचे ही प्रेम व सहकार्य लाभेल. आपणही जोडीदाराला वेळ द्याल. आपल्या बोलण्याने कुटुंबातील सदस्यांची मने दुखावली जाणार नाहीत याची मात्र काळजी घ्या. आरोग्य संबंधित काही तक्रारी सतावतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल.

मकर
सप्ताहाची सुरुवात आपल्य देऊन त्यानुसार कर्तव्य पूर्ती करून आनंदाची व लाभाची प्राप्ती कराल. आपण घेत असलेल्या मेहनतीचे अपेक्षित फळ आपणास प्राप्त होईल. कुटुंबात रममाण होऊन उत्तम कौटुंबिक सौख्याची प्राप्ती कराल.उत्तम गृहसौख्य, वास्तू, वाहन सौख्य लाभेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काही खर्च वाढतील.काही चिंता सतावतील.मात्र आपण त्यावर यशस्वी मात कराल.नोकरदार, व्यावसायिक मंडळींसाठी काहीसा अडचणींचा कालावधी असेल.कष्टाच्या मानाने अपेक्षित लाभ होणार नाही.

कुंभ
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल.उत्तम पारिवारिक, कौटुंबिक सौख्य लाभेल.प्रिय व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत कराल.या सप्ताहात आपल्या कामाला अत्यंत महत्त्व द्याल.कामाचा काहीसा तणाव जाणवेल. मात्र आपले काम चोख पार पाडण्याचा आपण प्रयत्न कराल. त्यातूनच भाग्याची, आनंदाची व लाभाची प्राप्ती कराल.आपल्या परिश्रमाचे फळ आपणास प्राप्त होईल.त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल.सप्ताहाच्या शेवटी मात्र काहीशी दगदग, धावपळ संभवते. अचानक काही खर्च डोके वर काढतील. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.

मीन
सप्ताहाची सुरुवात काहीशी त्रासदायक, अडीअडचणींनीयुक्त अशी जाऊ शकते. नंतर मात्र उत्तम सप्ताह असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही असेल. नोकरी- व्यवसायानिमित्त काही प्रवास संभवतात. या सप्ताहात आपल्या कामाला जास्त महत्त्व द्याल. बरीच महत्त्वाची कामे पूर्ण कराल. व्यापार व्यवसायानिमित्त काही खर्च संभवतात. जोडीदाराच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. गृहसौख्य, वास्तू, वाहन सौख्य सामान्य राहीलं. संततीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घेत असलेल्या मेहनतीच्या मानाने अपेक्षित फलप्राप्ती या सप्ताहात संभवणार नाही

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)