Skip to content

डाँ. ज्योती जोशी

आजचे पंचांग 26-01-2022

*राशीभविष्य*   

बुधवार २६ जानेवारी २०२२

{ आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }


मेष
आज सुखी, आनंदी सहजीवनाचा आस्वाद घ्याल. जोडीदाराची उत्तम साथ व सहकार्य लाभेल. व्यापार-व्यवसायात काही नवीन संधी निर्माण होतील.

वृषभ
आज काही अप्रिय घटना व प्रसंग यांना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे तशी मानसिक तयारी ठेवा. प्रकृतीच्या काही चिंता भेडसावतील. कोणाचे सहकार्य मिळणार नाही.

मिथुन
आज आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव द्याल. काही मनोरंजनात्मक गोष्टी करण्यात वेळ जाईल. काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल.

कर्क
आज शक्य होतील तेवढेच कामे हातात घ्या, नाही तर कामाच्या व्यापाने दमछाक होईल. जे काम ठरवले आहे तेच पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. नाहीतर वेळ व्यर्थ जाईल.

सिंह
आज व्यवसायवृद्धीचा विचार करून व्यापार-व्यवसायात काही धाडसी निर्णय घ्याल. त्यात ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन अवश्य घ्या. सहकार्य लाभेल.

कन्या
आज कुटुंबीयांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेणे आज आवश्यक राहील. कुटुंबीयांच्या मताचा, इच्छांचा आदर करा.

तुळ
आज जोडीदाराचे भरभरून प्रेम व सहकार्य मिळेल. व्यावसायिक, व्यवहारी यशाची प्राप्ती होईल. त्यामुळे आजचा दिवस उत्साह, आनंद, प्रसन्नता यांनी परिपूर्ण जाईल.

वृश्चिक
आज शारीरिक, मानसिक अस्थिरता भासेल. त्यामुळे काळजी घ्या. डोके शांत व मन स्थिर ठेवा. कोणतेही धाडस करण्यास जाऊ नका. अन्यथा नंतर पश्चाताप, मनस्ताप होईल.

धनु
इतके दिवस घेत असलेल्या मेहनतीचे, परिश्रमाचे शुभ फलित आज आपणास प्राप्त होईल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या इच्छा- आकांक्षांची आज प्राप्ती होईल.

मकर
आजच्या दिवशी काम करताना एका नवीन उत्साहाचा अनुभव घ्याल. आपले काम अधिक चोखपणे, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कुंभ
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असेल. भाग्याची, नशिबाची साथ आज लाभेल, त्यामुळे अत्यंत सुखावून जाल. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घ्याल.

मीन
आज नको त्या कामात वेळ वाया घालवू नका. आपले लक्ष व चित्त विचलित होऊ देऊ नका. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्या.

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)