Skip to content

विवाहयोगासाठी ज्योतिषशास्त्र

विवाहयोगासाठी ज्योतिषशास्त्र

मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यावर अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह होय. विवाह ही स्त्री अथवा पुरुषाच्या आयुष्यातील खूप मोठी घटना असते. कारण तेव्हापासून एका नवीन जीवनाला सुरुवात होत असते. असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. आम्ही म्हणतो लग्नाच्या गाठी पत्रिकेतील ग्रहांवरुन कळतात. विवाहाच्या दृष्टीने जातकाच्या पत्रिकेतील सप्तम स्थान हे फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. व्यक्तीस मिळणारा वैवाहिक जोडीदार आणि जोडीदाराला मिळणाऱ्या शाररीक व मानसिक सौख्याचा विचार पत्रिकेतील सप्तम स्थानावरुन केला जातो. उपवर मुला – मुलींची विवाहाविषयीची मते, व्यक्तीचे चारित्र्य, वैवाहिक वृत्ती, अनैतिक संबंध, लैंगिक शक्ती, पुरुषत्व, नपुसंकत्व, जोडीराचा रंग, स्वभाव, रुप, पत्नी – पत्नीमधील प्रेम, आपुलकी, मतभिन्नता, मत्सर, जोडीदाराचे आजार, त्रास, मृत्यू, द्विभार्यायोग, वंध्यंत्व, घटस्पोट आदी सर्व गोष्टी पत्रिकेतील सप्तम स्थानावरुनच कळतात. एवढेच नव्हे तर आपला जोडीदार कुठला असेल? हे सुद्धा आपल्याच पत्रिकेवरुन कळू शकते. पत्रिकेत प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ या स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवि हे ग्रह असल्यास जन्मस्थानापासून 25 किलोमीटरच्या अंतरावर असलेला जोडीदार लाभत असतो. याशिवाय पंचम व सप्तम या दोन स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवि हे ग्रह असल्यास जोडीदार आपल्या नात्यामधील, परिचित, ओळखीच्या व्यक्तींमधील असतो. अष्टम व एकादश या दोन स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवि असल्यास जोडीदार व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने ओळखीचा असू शकतो. याशिवाय नवम व द्वादश या दोन स्थानांमध्ये शुक्र, चंद्र, रवि असल्यास जोडीदार विदेशात राहणारा किंवा लग्नानंतर विदेशात जाणारा सुद्धा असू शकतो.

आपल्या किंवा आपल्या परिवारातील जातकाच्या आयुष्यात विवाह योगाविषयी जाणून घेण्यासाठी अवश्य सपंर्क साधा.

 

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

[wpforms id="149"]